
सर्वत्र धुळवड जल्लोषात साजरी होत असताना वडाळी टि टी परिसरात रंगाचा बेरंग झाला. पाय लागून बियरची बाटली फुटल्याच्या रागातून चौघांनी मिळून लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
तुषार उज्जैनवाला (20) असे तरुणाचे नाव होते. आज दुपारच्या सुमारास चौघे तरुण घराच्या परिसरात बियर पित बसले होते. त्यावेळी तेथून तुषारचा भाऊ व त्याचा मित्र जात असताना भावाचा त्या तरुणांच्या बियर बाटलीला पाय लागला. त्यामुळे ती बाटली पडून फुटली. यातून बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. चौघांनी मिळून तुषारला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या तुषारला शीव इस्पितळात नेण्यात आले. मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.




























































