विधानसभेत गुरुवारी बहुमत चाचणी होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court_295

महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी बहुमत चाचणी होणार आहे. ही बहुमत चाचणी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्यपालांनी गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते. बहुमत चाचणी रोखण्यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीच्या स्थगितीला नकार दिला आहे. त्यामुळे गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.