काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, तिरंगा फडकावत तरुणाची ‘वंदे मातरम’ घोषणाबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बुधवारी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ झाला. पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती हातामध्ये तिरंगा घेऊन आली आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देऊ लागली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट म्हणणे हिंदुस्थानी संस्कृतिचा अपमान असल्याचे त्या व्यक्तीने म्हटले.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणाचे नाव नचिकेता वाल्हेकर असून तो हिम्मतनगरचा रहिवासी आहे. हा तरुण भाजप कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नचिकेता यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांचे नाव घेण्याची यांच्यामध्ये (काँग्रेस) हिंमत नाही. यांना निवडणूक लढता येत नाही. हे लोक फक्त मोदी-शाह, मोदी शाह करत बसले आहेत. मोदी-शाह यांनी देशासाठी खूप काही केले आहे.