मोदी भक्ताचे डोळे उघडले, सरकारचे जाहीर वाभाडे काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अच्छे दिनची आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला रामराम ठोकल्याचं सांगणाऱ्या एका मोदी समर्थकाने भाजपबद्दल गौप्यस्फोट केला आहे. शिवम शंकर सिंग असं या तरुणाचं नाव असून तो इंडिया फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेचा संशोधक विद्यार्थी आहे. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारात त्याने डेटा अॅनालिस्ट म्हणून काम केलं आहे. भाजपमुळे देशाची राजकीय स्थिती सध्या सर्वात वाईट अवस्थेत असल्याचं सांगत त्याने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजप सोडण्याची कारणे सविस्तर सांगितली आहेत.

शिवम सिंगने भाजप सोडण्याची कारणं विशद करताना भाजप फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप केला आहे. कोणतंही सरकार हे सर्वथा योग्य किंवा अयोग्य नसतं. प्रत्येक सरकारमध्ये चांगली आणि वाईट अशा दोन्हीही बाजू असतात. पण, भाजप सरकारने जाणीवपूर्वक जी राजकीय आणि सामाजिक अस्थिरता पसरवली आहे. ती न पटल्यामुळेच आपण भाजप सोडत असल्याचं शिवम याने स्पष्ट केलं आहे.

एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने भाजप सोडण्याबद्दल सविस्तर लिहिले आहे. भाजप विरुद्ध बोलणं म्हणजे राष्ट्रद्रोह किंवा हिंदूविरोध असल्याचं पसरवणं, काँग्रेसने ७० वर्षांमध्ये काहीही काम केलेलं नसल्याचा आरोप करणं, प्रसारमाध्यमांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करून त्यांचा असंतोष ओढवून घेणं, भाजपप्रणित माध्यमांचा प्रसार आणि प्रचार करणं, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली महासंचालनालय या देशातल्या महत्त्वाच्या संस्थांचा गैरवापर करणं असे काही अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप शिवम याने भाजपवर केले आहेत.

संपूर्ण पोस्ट इथे वाचा-

Shivam Shankar Singh

Why I am resigning from BJP: Political discourse is at it’s lowest point in the country, at least in my lifetime. The partisanship bias is unbelievable and people continue to support their side no…