
मालवणी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मारहाणप्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
सचिन म्हस्के हे मालवणी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी ते डय़ुटीला होते. सायंकाळी एक जण पोलीस ठाण्यात आला. म्हस्के हे त्याला समजावून सांगत होते. मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तेथे एक महिला या बसल्या होत्या. तेव्हा मस्के यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. त्याने पोलीस ठाण्यातच अधिकाऱयांना धमकी देऊन शिवीगाळ करू लागला. तसेच त्याने म्हस्के यांच्यावर लाथ मारली. एवढय़ावर न थांबता त्याने म्हस्के याच्या पंबरेला असलेला पट्टा काढण्याचा प्रयत्न केला. मारहाणप्रकरणी म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.





























































