
पावसाळा सुरु होताच मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. यामुळे अनेक गाड्यांचे व घरांचे नुकसान तर होतेच पण काहीवेळा निष्पाप व्यक्तींना झाड अंगावर पडून आपला जीव देखील गमवावा लागतो. सोमवारी दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर क्षुश्रुषा रुग्णालय येथे एक भले मोठे झाड कोसळले. साधारण पहाटेच्या सुमरास हे झाड कोसळले. पहाटेच्या वेळी यामार्गावर जास्त वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या झाडाच्या फांद्या कापल्या व झाड बाजूला केले. पहाटेच हे झाड कोसळल्यामुळे रानडे मार्गावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाचा वापर करावा लागला

चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीच्या वेळी मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे अशावेळी मुंबईकरांनी रस्त्यावरून चालताना सावध असणे गरजेचे आहे.

























































