
राज्यामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकींचे वारे वाहात असून, आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहायकाच्या हातामध्ये रिव्हाॅल्वर असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर हा व्हिडीओ पोस्ट करुन, राज्यातील भयाण वास्तवावर बोट ठेवले आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की,
आमदार संग्राम जगताप यांच्या अनुपस्थितीत त्यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत. राज्यामध्ये सध्या दहशत आणि ठोकशाहीच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये मांडले आहे.
आमदार संग्राम जगताप सोबत नसताना
संग्राम जगताप यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत.#दहशत #ठोकशाही pic.twitter.com/FTBWVdgSvt— SushmaTai Andhare (@andharesushama) January 5, 2026
राज्यामध्ये सध्याच्या घडीला नगरसेवक पदाच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. त्यातच काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणे आणि अमिष दाखवण्याचे प्रकार सुरु आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहायकासह त्यांच्या बाॅडीगार्डने समोर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर हे असे रिव्हाॅल्वर घेऊन उभे असणे हा प्रकार घातक आहे.



























































