Pune crime news – आयटी इंजिनीअर तरुणीचा गोळय़ा घालून खून

आयटी इंजिनीअर तरुणीचा हॉटेलमधील खोलीत गोळ्या झाडून खून करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार हिंजवडीतील ‘ओयो टाऊन हाऊस’ या लॉजमध्ये रविवारी उघडकीस आला. या घटनेने आयटी पार्क परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खून करणाऱया प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमप्रकरणातील वादातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदना के. द्विवेदी (वय 26, सध्या रा. हिंजवडी; मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.