व्हिडीओ- त्याने नको तिथे स्पर्श केला, तिने त्याला धरून हाणला!

17

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलांसोबत होणारी छेडछाड ही समस्या जगभरात सर्वत्र सारखीच आहे. मग तो हिंदुस्थान असो किंवा आणखी कुठला देश. पण, लोकलज्जेस्तव गप्प बसणाऱ्या महिलेने जर आवाज उठवला तर ती छेड काढणाऱ्याची बोलती बंद होते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओत एका तरुणीची छेड काढल्याचं दिसत आहे. ही तरुणी एका हॉटेलमध्ये वेट्रेसचं काम करत होती. ती पाठमोरी उभी असताना तिथून जाणाऱ्या एका पुरुषाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्या स्पर्शाची जाणीव होताच क्षणी ती वळली. तिने त्याचं बखोटं पकडून त्याला मागे खेचलं आणि जमिनीवर आपटलं.

या घटनेनंतर सदर तरुणीने पोलिसांकडे तक्रार करत या आरोपीला बेड्या ठोकायला लावल्या. हा विकृत पुरुष विवाहित असून त्याला २ मुली असल्याचंही समोर आलं. हा व्हिडीओ कुठल्या देशातला आहे, हे कळलेलं नाही. मात्र, या तरुणीच्या या रणरागिणीच्या अवताराला मात्र नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या