किरकोळ वादातून युवकाची हत्या झाल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. अहमद मोहंमद सईद पठाण असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्याची रवानगी बालगृहात केली आहे. एक जण पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अहमद पठाण हा गोवंडी परिसरात राहत होता. तर अल्पवयीन मुले देखील त्याच परिसरात राहत होती.
काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग एकाच्या डोक्यात होता. त्याने अल्पवयीन मुलांना अहमदवर हल्ला करण्यास सांगितले. शनिवारी अहमद हा प्लॉट नंबर 25 येथील पाण्याची टाकी येथे आला. तेथे आल्यावर त्याने अहमद सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्या तिघांनी अहमदवर हल्ला करून पळ काढला. जखमी असलेल्या अहमदला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. याची माहिती समजताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी आले.
अहमदच्या भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत एकाचे नाव समोर आले. ताब्यात घेतलेल्या त्या तिघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.