
2 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 मिशनला लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचिंगसाठी स्पेसक्राफ्ट तयार असल्याची माहिती अहमदाबादमधील इस्रोचे स्पेस ऑप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी गुरुवारी दिली.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून ‘आदित्य एल-1’ ची लाँचिंग केली जाणार आहे. 15 लाख किमीचा प्रवास 127 दिवसांत पूर्ण केला जाईल. हे हॅलो ऑर्बिट (कक्ष) मध्ये तैनात केले जाईल. जेथे एल-1 पॉइंट असतो. हे पॉइंट सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान असते. या मिशनला पीएसएलव्ही रॉकेटने लाँच केले जाईल. व्हीएलसी पेलोडमध्ये बसवलेला वैज्ञानिक पॅमेरा सूर्याचा हाय रिझॉल्यूशनचा पह्टो घेईल, असे व्हीएलसी पेलोडचे प्रिसिंपल इन्वेस्टिगेटर राघवेंद्र प्रसाद यांनी सांगितले.





























































