
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मंगळवार, 13 जून रोजी वाढदिवस असून यानिमित्त शुभेच्छा देणारी होर्डिंग लावू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांना केले आहे.
राज्यभरात आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिक विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. यानिमित्त शुभेच्छांचाही प्रचंड ओघ असतो. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हार्ंडगबाबत महत्त्वाचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणतीही अधिकृत वा अनधिकृत होर्डिंग लावण्यात येऊ नयेत, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.





























































