
महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा 21 सप्टेंबर रोजी झाली तेव्हापासून दोन्ही राज्यांतील प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय झालेले दिसत आहेत.
21 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या 29 दिवसांच्या ट्विटर डेटा विश्लेषणानुसार शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण या नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्विट करण्यामध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सर्वात पुढे आहेत. खट्टर यांनी निवडणूक घोषित झाल्यापासून 1100 पेक्षा जास्त ट्विट केले आहेत.


























































