दहिसरमध्ये 40 बेडस्च्या डायलिसीस सेंटरचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी केलेल्या कामांची यादी नाक्यानाक्यावर लावू शकतात. कारण शिवसेनाच जनतेच्या प्रश्नांसाठी खऱया अर्थाने झटते, असे प्रतिपादन शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. दहिसरमध्ये 40 बेडस्चे डायलिसीस सेंटर उभे राहिले असून त्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला परिसरातील तब्बल 300 डॉक्टर्स उपस्थित होते, तर त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत दहा हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. यात महिला आणि तरुणांची संख्या मोठी होती.

तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे डायलिसीस सेंटर उभारण्यात आले आहे. मनन इमारतीजवळ दुसरा मजला, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ, आनंद नगर, दहिसर पूर्व या ठिकाणी हे डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, अशोकवन या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत 56 विधानसभा क्षेत्रांना भेटी दिल्याचे तसेच बेरोजगारमुक्त, प्रदुषणमुक्त विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी मागाठाणेतील जनतेचा आशीर्वाद आदित्य ठाकरे यांनी मागितला. यावेळी प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणेतील विकासकामांचा आढावा सादर करून पुढील विकासकामांचा आराखडा जनतेसमोर मांडला. वन खात्याच्या जमिनीवरील घरांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न मांडून येत्या काही दिवसांत याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री सचिन अहिर, खासदार गोपाळ शेट्टी, विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, मनीषा चौधरी, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, विभाग क्रमांक-1 चे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.