आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने कोकणासाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांसाठी 100 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरर्सचे रत्नागिरी जिह्यासाठी वाटप करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जि. प. उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शिवसेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी व इतर उपस्थित होते. रत्नागिरी जिह्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या 50 वायल उपलब्ध करून दिल्या. त्या सर्व वायल जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या.

स्थानिक विकास निधीतून कोविड-19 चा उपचार सुविधा वाढविण्यात येणार असून यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. याबाबत त्यांनी आज एका बैठकीत माहिती दिली. हा निधी ग्रामीण रुग्णालय पाली आणि संगमेश्वर, मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य पेंद्र, रत्नागिरी नगर परिषदेचे कोविड केअर सेंटर आणि मास्क वाटपासाठी खर्च करण्यात येणार आहे.

जिल्हा माहिती कार्यालय अद्ययावत

जिल्हा विकास निधीअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयासाठी अद्ययावत डिजिटल व्हिडीओ कॅमेरा आणि एक डिजिटल स्टील कॅमेरा खरेदी करण्यात आला आहे. हा कॅमेरा यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांना प्रदान करण्यात आला.