दुष्काळाचे सावट आहे; पण घाबरू नका शिवसेना पाठीशी आहे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गंगाखेड

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु शेतकऱ्यांनो घाबरू नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असे भावनिक आवाहन शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.

परळी रोडवरील साई वृंदावन मंगल कार्यालयात आदित्य ठाकरे यांनी आज जन आशिर्वाद यात्रेनिमित्त जनतेशी संवाद साधला. तत्पूर्वी, मुख्य बाजारपेठेतून आदित्य ठाकरे यांची रॅली निघून साई वृंदावन मंगल कार्यालय येथे भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भगव्यासोबत आमची युती आहे व युतीला सोबत घेऊनच लढणार असल्याचे स्पष्ट करीत फक्त आपले आशीर्वाद असेच कायम ठेवा, असेही आवाहन केले. ते पुढे म्हणाले, परभणी जिल्हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर प्रेम करणारा आहे. मराठवाड्यात पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आहे. परंतु तुम्ही घाबरू नका, शिवसेना आपल्या सदैव पाठीशी आहे.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्या समावेत शिवसेना नेते तथा पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राज्याचे पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, सचिन अहिर, शिल्पा सरतोपदार, खासदार संजय जाधव, हेमंत पाटील, युवासेनेचे नेते जय सरपोतदार, आमदार डॉ. राहुल पाटील, सुभाष साबणे, वरुण देसाई, रुपेश कदम, अमित गिते, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सखुबाई लटपटे, विधानसभाप्रमुख बालासाहेब निरस, उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, जितेश गोरे, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.