सत्ता नसल्याने फडणवीस यांना वैफल्य आले! आदित्य ठाकरे यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोळे बंद करून फिरणाऱयांना सरकार दिसेल कसं? असा थेट हल्ला शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आल्याचा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

आदित्य ठाकरे आज चंद्रपूर दौऱयावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. देवेंद्र फडणवीस यांच्यावरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी थेट हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता नसल्यामुळे वैफल्य आले आहे. त्यामुळेच ते कधी मुख्यमंत्र्यांवर बोलतात तर कधी सरकार कुठेच दिसत नाही, असे म्हणत असतात. त्यांना आपलं सरकार येईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं सतत वाटत असते. ही त्यांची उद्विग्नता आहे, अशी टोलेबाजी आदित्य ठाकरे यांनी केली.

राज्यात सरकार कुठेच दिसत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली होती. फडणवीसांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेय. उघडे डोळे असते तर सरकार दिसलं असतं, सरकारवर प्रेम करणारी लोपं दिसली असती; पण डोळे बंद करून फिरणाऱयांना सरकार दिसेल कसं, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. सत्तेतील तिन्ही पक्ष आनंदाने एकत्र आहोत. कोणताही वाद नाही. मिळून अन्यायाविरुद्ध लढा देऊ, असेही आदित्य ठाकरे सांगायला विसरले नाहीत.