निर्लज्जपणाचा कळस! आदित्य ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंना सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगत सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


”निर्लज्जपणाचा कळस! आरोग्यमंत्री म्हणताएत की सगळंच कॅबिनेट जबाबदार आहे, मग द्या राजीनामा! असल्या पळपुट्या भूमिकेमुळे आणि घाणेरड्या राजकारणामुळे आपलं राज्य मागे जात आहे” असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले.