भगवी टोपी दिसताच आदित्य ठाकरे थांबले; रस्त्यात उतरून शिवसैनिकांशी साधला संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायरनचा घोंगावणारा आवाज…वेगाने पुढे सरकणारा गाड्यांचा ताफा…अचानक भगवी टोपी घातलेली एक व्यक्ती नजरेस पडते…त्याचक्षणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची गाडी थांबते…काय झालं, या प्रश्नार्थक चेहऱ्याने सर्वजण एकमेकांकडे पहात असतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे गाडीत उतरून आपल्या शिवसैनिकांकडे चालत जात त्याच्यांशी संवाद साधतात. या घटनेने शिवसेना नेते,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना शिवसैनिकांविषयी असलेला आदर पहायला मिळाला. शिवसेनेत शिवसैनिकांचे महत्व, सन्मान अधोरेखित करणारी ही घटना आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघातील रामपूर येथील सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाच्या उद्घटानानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे चिपळूणच्या दिशेने निघाले असताना तांबी गावाजवळ भगवी टोपी घालून कलिंगड विकत असलेली व्यक्ती आदित्य ठाकरे यांना दिसली. उन्हात उभ्या असलेल्या शिवसैनिकांना थांबवून त्यांनी विचारपूस केली.

त्याठिकाणी उभे असलेले शिवसैनिक नोकरी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. जाताना घरी सावकाश आणि सुखरूप जा, अशी सदिच्छा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पर्यटनमंत्री गाडी थांबवून आपली विचारपूस करत आहेत याप्रसंगाने शिवसैनिकांच्या अंगावर मूठभर मांस चढले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. यावेळी त्याशिवसैनिकांनी भेट म्हणून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कलिंगड दिले. यावेळी पालकमंत्री ॲड.अनिल परब,आमदार भास्कर जाधव,योगेश कदम,माजी सभापती अरूण कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.