मराठीचा ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहुया, आदित्य ठाकरे यांचे आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

”मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी तसेच मराठीचा ज्ञानभाषा म्हणून प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया’, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. या ट्विट सोबत आदित्य ठाकरे यांनी मराठीचे वर्णन करणारी ओवी देखील शेअर केली आहे. ”रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी; चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी” ही ओवी आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.