आजरा साखर कारखाना निवडणूक थांबवण्याचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता पावसाळा संपल्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या ज्या टप्प्यावर ही निवडणूक प्रक्रिया आहे तेथेच थांबवण्यात आली आहे. याबाबतचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कारखान्याची निवडणूक आता 30 सप्टेंबरनंतर होणार आहे.

राज्यभरात सुरू होणारा पाऊस, त्यामुळे उद्भवणारी आपत्तीजन्य परिस्थिती, पाऊस कालावधीतील खरीप हंगामाची कामे आदी गोष्टींचा विचार करून कारखाना निवडणूक लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 23 मे 2023 रोजी संपली आहे. त्यादृष्टीने तत्काळ निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती. या साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी 2 मे आणि अंतिम मतदार यादी 25 मे रोजी प्रसिद्ध झाली होती. आजरा कारखान्याची निवडणूक जुलै महिन्याच्या मध्यावर 12 ते 19 जुलै दरम्यान होण्याची शक्यता होती. मात्र, कारखान्याचे कार्यक्षेत्र हे अतिपावसाच्या आजरा आणि चंदगड तालुक्यांमध्ये विखुरले आहे. या परिसरात जून महिन्यापासूनच पावसाला सुरुवात होते. पावसाच्या कालावधीत शासकीय यंत्रणा पुनर्नियोजन आणि अन्य कामांमध्ये व्यस्त असते. अशा परिस्थितीत कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबविणे सभासद, मतदार आणि निवडणूक यंत्रणेच्या सोयीची नसल्याचे राज्यपालांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे