एजाज खानला पाठवणार समन्स

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या उल्लू अॅप्सवर अश्लील दृश्य दाखवल्याबाबत अभिनेता एजाज खानविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाल्याने एजाज खानच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच अंबोली पोलीस आता एजाज खानला समन्स पाठवणार आहेत. गेल्याच आठवडय़ात ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या हाऊस ऑफ अरेस्टचे काही भाग प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन अंबोली पोलिसांनी अभिनेता एजाज खानविरोधात गुन्हा नोंद केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी उल्लू अॅप्सच्या संबंधित असणाऱयाचेदेखील जबाब नोंदवले होते. अंबोली पोलिसांनी अभिनेता एजाज खानला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहेत. उल्लू अॅप्सशी संबंधित आणि एजाज खानला तपास अधिकाऱयांसमोर हजर राहून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सांगितले आहे.