आमीर खानचा सोशल मीडियाला ‘रामराम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अभिनेता आमीर खान याने रविवारी आपला वाढदिवस साजरा केला. आमीर खानचे चाहते जगभरात पसरले असले तरी त्याला स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची आवड नाही. त्यामुळेच वाढदिवसाचं निमित्त साधून त्याने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

आमीर खान याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून ही घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आधी आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी दिलेल्या अमाप प्रेम आणि शुभेच्छांचा त्याने स्वीकार करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच ही पोस्ट आपली सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट असून आपण आता सोशल मीडियाला रामराम ठोकत असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण, त्याच्या चाहत्यांना त्याच्याशी संवाद साधता यावा यासाठी त्याने आमीर खान प्रोडक्शन्स या नावाने स्वतःचं चॅनल सुरू केलं आहे. त्याद्वारे तो त्याच्या चाहत्यांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे.


View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan)