आमीर खानच्या ’सितारे जमीन पर’ला प्रतिसाद

आमिर खानच्या ’सीतारे जमीन पर’ या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 14 चित्रपटांना पहिल्या दिवशीच्या कमाईत मागे टाकले आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमीर खानच्या ‘तारे जमीन पर’ला 2.62 कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली होती. या विकेंडला चित्रपट 50 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज चित्रपट निर्मात्याला आहे.