
सामना ऑनलाईन । मुंबई
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यावर आमीर खान याने या प्रकरणाची चौकशी व्हावी असं म्हटलं आहे. त्याच्या आगामी ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी तो बोलत होता.
तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे बॉलिवूडसह राजकीय गोटातही खळबळ माजली आहे. तनुश्रीने नानांवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलर लाँच प्रसंगी माध्यमांनी यावर कलाकारांना प्रश्न विचारले. तेव्हा आमीर खान म्हणाला की, एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल, तर त्यावर बोलणं कठीण आहे. जर असं झालं असेल, तर ते चुकीचं आहे. मी यावर अधिक बोलू शकत नाही. या गोष्टीची चौकशी व्हायला हवी” असं आमीर यावेळी म्हणाला.
माध्यमांनी हा प्रश्न बिग बींनाही विचारला. तेव्हा त्यावर बिग बी म्हणाले की, मी तनुश्री दत्ताही नाही आणि नाना पाटेकरही नाही. त्यामुळे या मुद्द्यावर मी काहीच बोलू शकत नाही.” असं बिग बींनी म्हटलं आहे.
summary- aamir khan speaks over tanushree issue































































