
संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाड्मय मंडळ हे मुंबई विद्यापीठातील सर्वात जुने कार्यरत मंडळ आहे. मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्राचीन इतिहास त्याचबरोबर त्याचे महत्त्व आजकालच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असते. ‘आमोद’ हा मराठी वाड्मय मंडळाचा अत्यंत महत्त्वाचा व मोठा उत्सव आहे. आमोद म्हणजे निव्वळ आनंद. यंदाही हा महोत्सव 15, 21 आणि 22 जानेवारी रोजी होणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून आमोद हा आंतरमहाविद्यालयीन उत्सव विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी संधी प्रदान करतो. विद्यार्थ्यांना दिग्गज कलाकारांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळवून देण्यासोबत त्यांना आपापल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही देतो. यंदा शतकाच्या क्षितिजावर ही आमोदची थीम आहे. यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. कॉलेजियन्सकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी मराठी वाड्मय मंडळाच्या इन्स्टाग्राम, ट्विटवर अकाऊंटला फॉलो करा.


























































