माझा आवडता बाप्पा : शिवपूजा – आनंद ओक

> आपलं आवडतं दैवत? ः महादेव

> त्याचं कौतुक कसं करायला आवडतं? ः माझा जन्म महाशिवरात्रीचा… लहानपणी मी पूजा सांगायला जायचो. शिवपूजेतून उत्साह जाणवतो.

> संकटात तो कशी मदत करतो, असं वाटतं? ः आयुष्यात अनेक अडचणी आल्या. संगीत क्षेत्र सोडावं असंही वाटू लागलं होतं, पण माझ्या घरच्यांनी आणि महादेवाच्या कृपेनेच त्यामध्ये सातत्य ठेवलं. आज चांगलं यश मला या करियरमध्ये मिळतय.

> कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? ः कलेवर भक्ती असली की, तेच आपलं दैवत होतं. संगीत कलेचं शंकर हे दैवत आहे, नाटक, अभिनय, सादरीकरण, डिझायनिंग, परफॉर्मिंग आर्टमध्ये मी रमतो.

> कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? ः मुळातच मी देवभोळा आहे. त्यामुळे दत्त, मारुती, गणपती स्त्र्ााsत्र म्हणतो. देवाला नमस्कार करूनच मी घराबाहेर पडतो.

> त्याच्यावर रागावता का? ः नक्कीच. कधी मिटिंग होतात, पण पुढे काहीही होत नाही. स्ट्रगलच्या काळात माणूस आशादायी असतो. एखादी गोष्ट समोर असूनही माझ्यापर्यंत येत नाही, तेव्हा रागावतो. तरीही देव मला त्याची कारणंही सांगतो.

> देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो? ः लाड नक्कीच पुरवतो. संगीताचं कम्पोझिशन क्लायंट किंवा प्रोडय़ुसरला ऐकवायचं असतं. तेव्हा बऱयाचदा असं होतं की, मला पटकन छान सुचतं. ज्यावर दोन-तीन दिवसांपासून प्रयत्न करत असतो तेव्हा सुचत नाही. हे माझे लाडच आहेत.

> आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते? ः नटराज

> त्याच्यापाशी काय मागता? ः जे काम याआधी केलंय, आता जे करतोय आणि यापुढे जे करत राहीन त्यासाठी नेहमी तुझा आशीर्वाद असू दे. कितीही काहीही झालं तरी माझ्यातलं कामाचं तत्त्व नेहमी जपलं जावं. सोपं, सुटसुटीत काम करता यावं. चांगल, चिरंतन काम करत राहायला मिळावं.

> त्याच्या आवडीचा नैवेद्य काय दाखवता? ः दर शिवरात्रीला उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक घालतो.

> महादेवाची नियमित उपासना कशी करता? ः संपूर्ण श्रावण महिना, नवरात्र, आषाढी-कार्तिक, अंगारिकी चतुर्थी असे उपवास वर्षभरात करतो. रुद्रकवच महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवारी वाचतो.