
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आम आदमी पक्षाला आणखी एक दणका बसला असून आमदार देवेंद्र सहरावत यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, आमदार देवेंद्र सहरावत यांनी यापूर्वीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. ‘आप’मध्ये चांगल्या कामाची कदर नसल्याने पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सहरावत यांनी सांगितले.
Delhi: Rebel AAP MLA Devinder Kumar Sehrawat joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of Union Minister Vijay Goel. pic.twitter.com/DD5P3rVYLJ
— ANI (@ANI) May 6, 2019
देवेंद्र सहरावत म्हणाले की, आपमध्ये आमदार असतानाही मला अपमानीत व्हावे लागले. यावेळी सहरावत यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या मतदीने 3 हजार कोटींचे कामे करण्यात आली, परंतु केजरीवाल सरकारने एक रुपयाही दिला नाही. विरोधात असताना एवढे काम केले, तर भाजपमध्ये गेल्याने आणखी चांगले काम करू शकेल. म्हणून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सहरावत म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र सहरावत यांच्यासह अन्य काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. याआधी आप नेते मनीष सिसोदिया यांनी भाजप आमच्या 7 आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना भाजप नेते विजय गोयल यांनी आपचे 7 नाही तर14 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा टोला लगावला होता.



























































