
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते, खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा शनिवारी पार पडला.
दिल्ली येथील कनॉट प्लेस येथील कपूरथला हाऊस याठिकाणी दोघांचा साखरपुडा संपन्न झाला.
बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सारखपुड्याच्या सोहळ्याला हजेरी लावली.
यानंतर रात्री परिणीती चोप्रा हिने इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो शेअर केले.



























































