
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना एकमेकांवर टीका करताना नेतेमंडळीची जीभ घसरत आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मोदी हे नशेत तर्राट होऊन भाषण देतात त्यामुळे त्यांच्या भाषणांची चौकशी व्हायला हवी, असे वक्तव्य संजय सिंह यांनी केले आहे.
जो व्यक्ति दुनिया में नही है उसके बारे में ऐसी घटिया टिप्पणी गाँजेबाज़ मोदी ही कर सकता है,चुनाव आयोग गाँजे की बिक्री पर रोक लगाये मोदी की जाँच कराओ नशे की हालत में भाषण दे रहे हैं। https://t.co/jzV4uU8LZu
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 5, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका प्रचारसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हटले होते. त्यावरून टीका करताना संजय सिंहने मोदींना व्यसनी म्हटले आहे. संजय सिंह यांनी ट्विटरवरून मोदींवर टीका केली आहे. ‘जी व्यक्ती या जगात नाही त्या व्यक्तीबद्दल अशी घाणेरडी टीका व्यसनी मोदीच करू शकतात. निवडणूक आयोगाने गांजाच्या विक्रीवर बंदी आणावी व मोदी नशेत तर्राट होऊन जी भाषण करत आहेत त्यांची चौकशी करावी’, असे ट्विट संजय सिंग यांनी केले.






























































