भर गर्दीत मोदींनी नाकारला मास्क, ‘आप’ने व्हिडीओ शेअर करत दिला मजेशीर सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्दीत मास्क लावा असे सल्ले देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मात्र एका कार्यक्रमात मास्क न घातल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांना मास्क देऊ केला होता मात्र त्यांनी तो दोन वेळा नाकारला. या घटनेचा व्हिडीओ ‘आप’ने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यासोबत ‘मास्क वापरा, मोदींजींसारखे बनू नका’, अशी मजेशीर कॅप्शन देत पंतप्रधानांना ट्रोल केले आहे.

आपने शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका हातमागाच्या प्रदर्शनात स्टॉल्सवरील वस्तू बघताना दिसत आहेत. यावेळी मोदींनी मास्क देखील लावलेला नाही. प्रदर्शनात एका स्टॉलवर आल्यावर तेथील व्यक्तीने मोदींना मास्क दिला पण त्यांनी तो नाकारला. त्यानंतर पुन्हा त्यांना मास्क दिला मात्र त्यावेळी तो मास्क हातात घेऊन मोदींनी पुन्हा होता तिथे ठेवून दिला.

आपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या घटनेचा व्हिडीओ शेअर केला असून त्यावर ‘मास्क वापरा, मोदींजींसारखे बनू नका’, अशी कॅप्शन देखील दिली आहे.