
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी व चोळप्पा महाराज यांचे वंशज सुरेश पांडुरंग ऊर्फ अप्पू महाराज पुजारी (65) यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सुरेश पुजारी हे स्टेट बँकेच्या शाखाधिकारीपदावरून निवृत्त झाले असून त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता बसस्थानकाजवळील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ समधीमठ येथे होणाऱया पुण्यतिथी सोहळ्यात त्यांचा विशेष सहभाग असे. श्री स्वामी समर्थांचे शिष्य चोळप्पा महाराज यांचे सुरेश पुजारी हे वंशज होते.

































































