आराध्यानं ऐश्वर्याला पहिल्यांदाच फिल्ममध्ये पाहिलं, ‘ही’ होती रिअॅक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aishwarya-rai-aaradhya

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा ‘फन्ने खाँ’ हा सिनेमा भलेही मोठी कमाई करू शकला नाही. पण ऐश्वर्यासाठी हा सिनेमा खास ठरला आहे. कारण ही तसेच आहे. ऐश्वर्याची मुलगी आराध्यानं पाहिलेला तिचा हा पहिला चित्रपट आहे. आईला भल्यामोठ्या स्क्रीनवर पाहाताना आराध्या वेगळ्याच खुशीत होती, असं खुद्द ऐश्वर्यानं सांगितलं.

‘आराध्यानं मला अनेकदा टीव्ही वाहिन्यांवर, वृत्त वाहिन्यांवर पाहिलं आहे. मात्र भल्यामोठ्या पडद्यावर आपल्या आईला पाहण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. स्क्रीन मी झळकले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं. जे तिच्या मनातल्या भावना स्पष्ट करत होतं’, अशा शब्दात ऐश्वर्यानं तिची प्रतिक्रिया दिली.

आराध्यानं फन्ने खाँचं एक गाणं चित्रित होताना पाहिलं होतं. हे पाहतानाच तिला उत्सुकता होती की हा सिनेमा कधी झळकणार. तेव्हाच तिने सिनेमा पाहायचा हट्ट धरला होता, असंही ती म्हणाली. हा सिनेमा तिनं पूर्ण आणि अगदी आवडीनं पाहिला, असंही ती म्हणाली.

विशेष म्हणजे या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी आराध्यानं तिचे मित्रैत्रिणी आणि त्यांच्या पालकांनाही निमंत्रित केलं होतं. आराध्यानं पाहिलेला हा माझा पहिलाच सिनेमा असल्यानं मी खूप खूश असल्याचं तिनं सांगितलं.