
न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित 34 व्या एलआयसी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात वाशी केंद्राच्या मध्यमगती गोलंदाज आरव सेठीने अफलातून गोलंदाजी करत हॅटट्रिकसह सहा विकेट घेत घाटकोपर सेंटरचा दुसऱ्या डावात 119 धावांत खुर्दा उडवला आणि त्यांना फॉलोऑन दिला. माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात दिवसअखेर वाशी सेंटरने 5 बाद 173 धावा केल्या होत्या.
ठाणे केंद्राने बदलापूर केंद्रावर डाव आणि 172 धावांनी दणदणीत विजय मिळवला. माटुंगा जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात तनय महांसारियाने 34 धावांत आठ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. डोंबिवली केंद्राने कल्याण केंद्रावर 92 धावांनी विजय मिळवला. कल्याण केंद्राच्या फिरकीपटू दर्शन राठोडने सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या,



























































