
वाढत्या थंडीचा फटका माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. थंडीच्या दिवसांत प्राणी उष्णतेच्या शोधात फिरतात. त्यांची ही अवस्था एका व्यक्तीला पाहावली नाही आणि त्याने चक्क श्वानासाठी खास घर तयार केले आहे.
अभिजीत दोवराह या 32 वर्षीय तरुणाने ही अनोखी शक्कल लढवली आहे. श्वानांचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्याने बंद असलेला किंवा खराब झालेले टीव्हीपासून श्वानांसाठी घर तयार केले आहे. आसाम इथल्या शिवसागर परिसरात त्याने हे घर तयार केलेय. या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अभिजीतचे सर्वत्र काैतुक होत आहे. अभिजीतला कुत्रे खूप आवडतात. जेव्हा त्याच्या भावाने त्याला कुत्रा गिफ्ट केला तेव्हा हे प्रेम त्याच्यावर घडले. रस्त्यावरील भटक्या पुत्र्यांची देखील तो नेहमी काळजी घेतो. सध्या आपण भटक्या कुत्र्यांसाठी टीव्हीपासून 5 घर बनवली असून लवकरच आणखी 12 अशी घर बनवणार असल्याचे अभिजीतने सांगितले. मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. भटक्या प्राण्यांसाठी निवारा बनवण्यासाठी मी घरातल्यांची किंवा सरकारची कोणतीही मदत घेतली नाही. प्राण्यांवर असलेल्या प्रेमापोटी मी स्वखर्चातून हा उपक्रम राबवत असल्याचेही तो म्हणाला.



























































