नवरात्रीची नियमावली वेळीच जाहीर करा, आशीष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे गणेशमूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता नवरात्री उत्सव येणार आहे. मुंबईत देवीच्या मूर्ती तयार करणारे सुमारे पाच हजार मूर्तीकार व कारखाने आहेत. या मूर्तीकारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नकवरात्री उत्सवाच्या नियमावलीचा निर्णय वेळीच घ्या, अशी विनंती भाजपचे आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करणाऱयांची संख्या कमी झाल्याने मूर्तीकारांना मोठा फटका बसला आहे. पेणमधील दोहे, हमरापूर, केळवे या गावामध्ये गणेशमूर्तीकार व कारखाने मोठय़ा संख्येने आहेत. या गावातील मूर्तीकारांना मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बहुसंख्य मूर्तीकार त्याच कारखान्यात पुन्हा देवीच्या मूर्ती घडवित असल्याने त्यांना सरकारने वेळीच स्पष्टता देण्याची गरज आहे. देवीच्या मूर्ती घडवणाऱया मूर्तीकारांसमोर देवीच्या मूर्तीच्या उंचीच्या बाबत प्रश्न चिन्ह आहे. कोरोनाची झळ जशी अन्य उद्योगांना बसली आहे तशीच झळ याही उद्योगाला बसली आहे. त्यामुळे वेळीच स्पष्टता दिल्यास या उद्योगाचे नुकसान टळू शकेल, असे आशिष शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे