Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या सेटवरून अभिजित बिचुकलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये झळकलेला कवी आणि राजकीय नेता अभिजित बिचुकले याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे. बिचुकलेला अटक करण्यासाठी साताऱ्याहून पोलीस बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. तिथेच अभिजित याला अटक करण्यात आली.

अभिजीत बिचुकले हा गेल्या महिनाभरापासून बिग बॉस मराठीच्या घरात होता. तिथेही त्याने अनेक वाद ओढावून घेतले आहेत. सुरुवातीला घरातील महिलांना स्पर्श करण्यावरून त्याचे महिलांशी वाद झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी घरातील स्पर्धक रुपाली भोसले हिला शिवीगाळ करत तिच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य बिचुकलेने केली होती. त्याच्या रुपालीविरोधातील वक्तव्यांनंतर नेटकऱ्यांनी बिचुकलेला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती.