
हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन रहिवाशी असलेल्या 12 वर्षीय अभिमन्यू मिश्राने बुद्धिबळ जगताचा युवा ग्रॅण्डमास्टर होण्याचा विश्वविक्रम केला. त्याने 19 वर्षांपूर्वीचा युक्रेनचा सर्गे कर्याकीन याचा विक्रम मोडीत काढला. युवा टॉप-10 ग्रॅण्डमास्टरमध्ये हिंदुस्थानचे चार बुद्धिबळपटू आहेत, हे विशेष.
चेस.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हंगेरीतील बुडापेस्ट येथे अभिमन्यू मिश्राने हा विश्वविक्रम प्रस्तापित केला. त्याने तीन फेऱयांमध्ये ग्रॅण्डमास्टर किताबावर आपले नाव कोरले. अंतिम फेरी 10 खेळाडूंमध्ये राऊंड रॉबीन पद्धतीने खेळविण्यात आली. अभिमन्यू मिश्राने 12 वर्षे 4 महिने व 25 दिवसांचे वय असताना युवा ग्रॅण्डमास्टर होण्याचा बहुमान मिळविला. सर्गे कर्याकीन 2002मध्ये जेव्हा जगातील सर्वात युवा ग्रॅण्डमास्टर बनला होता, तेव्हा तो 12 वर्षे व 7 महिन्यांचा होता.




























































