अभिनव कोहलीने श्वेता तिवारी वर केले गंभीर आरोप

अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्यावर तिचा पती अभिनव कोहलीने गंभीर आरोप केले आहे श्वेताने त्यांचा मुलगा रियांश याला कुठेतरी लपून ठेवले असल्याचा आरोप अभिनवने केला आहे. यामुळे पुन्हा एकदा श्वेता तिवारी व अभिनव कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

श्वेताला झालेला कोरोना

गेल्या महिन्यात श्वेता तिवारी पॉझिटिव्ह आली होती त्यावेळी श्वेता व अभिनव यांचा मुलगा रियांश याला श्वेताने अभिनव कडे ठेवले होते. त्यामुळे रियांश गेल्या 40 दिवसांपासून अभिनव कडे होता. त्यावेळी अभिनव व त्याच्या आईने रियांशची काळजी घेतली. त्यानंतर 24 ऑक्‍टोबरला श्वेता तिवारी त्याला सोबत घेऊन गेली. तेव्हापासून अभिनव व मुलाचा काहीच संपर्क झालेला नाही. दरम्यान अभिनवने आरोप केला आहे की श्वेताने मुलाला कुठेतरी लपवून ठेवले आहे. एका न्यूज चैनल ला मुलाखत देताना अभिनवने हा आरोप केला आहे.

”मी माझ्या मुलाला भेटायला श्वेता तिवारी च्या घरी गेलो होतो मात्र तिथे कोणीही नव्हतं मी तिला मेसेज करतोय फोन करतोय पण तू उत्तर देत नाहीये गेल्या रविवारपासून मी प्रयत्न करतो माझे मुलाशी एकदाही बोलणे झाले नाही त्यामुळे मला असं वाटतंय की श्वेताने त्याला कुठेतरी लपून ठेवले आहे” असे अभिनव ने सांगितले

गेल्या वर्षी श्वेताने केलेला गंभीर आरोप

गेल्या वर्षी अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिचा पती अभिनेता अभिनव कोहली याच्याविरुद्ध रविवारी तक्रार दाखल केली होती. आपली मुलगी पलक हिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केला होता. त्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी श्वेताला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यावर बोलण्यासाठी आता श्वेताची मुलगी पलक हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

पलकने शेअर केलेली पोस्ट

पलकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. ‘ अनेक माध्यमांनी लैंगिक शोषण, मारहाण असे मुद्दे श्वेताने तिच्या तक्रारीत केल्याचं म्हटलं होतं. ते खोडून काढत पलकने असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ”माझ्या आईने नव्हे तर मी त्यांचे (अभिनव) अपशब्द सहन केले आहेत. मला किंवा माझ्या आईला त्यांनी कधीच मारहाण केली नाही. माझं शारीरिक शोषणही केलं नाही. फक्त ते बऱ्याचदा अतिशय अश्लाघ्य आणि त्रासदायक वक्तव्य करतात. या गोष्टी फक्त मी आणि माझ्या आईलाच माहीत आहेत. अन्य कुण्या स्त्रीने ती विधानं ऐकली तर तिला आपल्या वडिलांविषयी लाज वाटू शकते. कारण, पुरुषांकडून अशा शब्दांची अपेक्षा कुणीही करणार नाही, असं पलक तिवारी हिने स्पष्ट केलं होतं.

पलकने तिच्या आईविषयी सांगताना म्हटलं की, मला तिची मुलगी असल्याचा अभिमान आहे. मी माझ्या आईसोबत खंबीरपणे उभी आहे. ती एक अतिशय सशक्त व्यक्तिमत्वाची स्त्री आहे आणि माझ्यासाठी सर्वात आदरणीय व्यक्तीही. त्यांना समाजात वावरण्यासाठी कोणत्याही पुरुषाच्या आधाराची गरज नाही, असं सांगत पलकने श्वेता तिवारी हिला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं.

आपली प्रतिक्रिया द्या