प्राणघातक हल्ल्याचा आरोपी पंकजा मुंडेंच्या प्रचारात

मिंधे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी पुंडलिक खांडे हा 2 आठवडय़ांपासून फरार आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दंग असून रॅली, सभांमध्ये तो दिसून येत आहे. गृह खात्याचे संरक्षण मिळाल्यामुळेच खांडे राजरोस फिरत असल्याने बीडकरांमध्ये मात्र संताप व्यक्त होत आहे.

मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख असलेल्या पुंडलिक खांडे याचा  पोलीस दोन आठवडय़ांपासून शोध घेत आहेत. खांडेच्या शोधासाठी पोलिसांची पथके राज्यभरात पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र तो पंकजा मुंडे यांच्या प्रचारात दिसल्याने काखेत कळसा अन् गावाला वळसा असेच पोलिसांचे झाले आहे.