अबू सालेम 2030 पर्यंत तुरुंगातच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात गँगस्टर अबू सालेम 2030 पर्यंत तुरुंगातच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आज 1993 च्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच न्यायालयाने पोर्तुगालचा निषेध करतानाच सालेमने 25 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतरच त्याची सुटका होईल असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान हिंदुस्थान आणि पोर्तुगालदरम्यानच्या प्रर्त्यार्पण कायद्याबाबत केंद्र सरकार राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते असेही न्यायालयाने म्हटले आहे.