
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत. कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्लालयाजवळील आयआरबीशेजारील भारत बटालीयनवर छापा टाकून ४० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरिक्षक, २ सहाय्यक फौजदार, १ कॉन्स्टेबज आणि एका क्लार्कला रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआरबीच्या भरतीसाठी लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांना मिळाली होती. याच आधारे एसीबीने सापळा रचत सर्वांना रंगेहात पकडण्याचे ठरवले. मंगळवारी ठरल्याप्रमाणे फिर्यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी पोहोचल्यावर एसीबीने पोलीस निरीक्षकासह पाच जणांना ४० हजारांची लाच घेताना पकडले. या प्रकरणी एसीबीकडून संबंधीतांची चौकशी सुरू असून तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.





























































