मुहम्मद वसीम 160; युएईचा 471 धावांचा डोंगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसीसी प्रीमियर लीग स्पर्धेत यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीम (160) आणि वृत्य अरविंदने (174) वैयक्तिक दीडशतकांसह दुसऱया विकेटसाठी 244 धावांची भागी रचत 50 षटकांत विक्रमी 471 धावा ठोकल्या आणि सिंगापूरला 270 धावांवर रोखत 201 धावांनी दणदणीत विजयही मिळविला. कर्णधार मुहम्मद वसीमने सिंगापूरच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत 82 चेंडूंत 16 षटकार आणि 9 चौकारांची आतषबाजी करत 160 धावा केल्या. एका खेळीत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत तो दुसऱया स्थानावर आहे. सर्वाधिक 17 षटकार इयान मॉर्गनने ठोकले आहेत. तसेच 20 वर्षांच्या वृत्य अरविंदने आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी करताना 17 चौकार आणि 7 षटकार मारत 133 चेंडूंत 174 धावा काढल्या. त्याचप्रमाणे यूएई इंग्लंडच्या सर्वोच्च 498 धावांना मागे टाकण्यात थोडक्यात चुकले. ते आता तिसऱया क्रमांकावर आहेत.