
आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे रंगणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या मोहसीन नक्वी यांनी या निर्णयाची औपचारिक घोषणा करताना सांगितले की, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. ही प्रतिष्ठsची स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाईल. आम्हाला उत्तम क्रिकेट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. लवकरच याचे विस्तृत वेळापत्रक जाहीर केले जाईल.’
हिंदुस्थान–पाकिस्तान एकाच गटात
आशियाई क्रिकेट परिषद आणि प्रसारक यांच्यातील करारानुसार, हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवले जाईल. सुपर सिक्स फेरीतही त्यांच्यात पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे.