भरधाव वेगातील टिप्परने मोटारसायकलला धडक दिली, महिलेसह मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वेगातील टीपरने मोटरसायकलला धडक दिली या अपघातामध्ये मोटरसायकल वरील महिला आणि अडीच वर्षाचा मुलगा घटनास्थळीच मरण पावले. लातूर अंबाजोगाई रस्त्यावरील महापूर येथील मांजरा नदीच्या पुलाजवळ हा अपघात घडला.

रेणापूर तालुक्यातील मौजे कुंभारी येथील तुकाराम बाबुराव शिंदाळे हे आपल्या मोटरसायकलवरून पत्नी आणि मुलाला घेऊन लातूरकडे जात होते. लातूर कडून भरधाव वेगामध्ये एम एच 24 एयु 1 8 3 0 हा टिप्पर अंबाजोगाई कडे जात होता. मोटरसायकलला धडकल्यानंतर टिप्परच्या चाकाखाली महिला आणि मुलगा आल्याने दोघांचाही चेंदामेंदा झाला होता.

घटनास्थळी दोघांचाही मृत्यू झाला यशोदा तुकाराम शिंगाळे व त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा मरण पावला तर तुकाराम शिंगाळे गंभीर जखमी झाले. अपघात स्थळी मोठी गर्दी झालेली होती.