चंद्रपुरात ताडोबा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला अपघात, 2 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी येत असलेल्या  पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा उपचादरम्यान मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले.

tadoba-accident2

सर्व प्रवासी नागपुरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. चिमूर तालुक्यातील कोलारा प्रवेशद्वारातून ताडोबात प्रवेश करायचा होता. त्यासाठी या पर्यटकांची लक्झरी गाडी मासळमार्गे निघाली. मात्र गावाजवळ असलेल्या भदगा नाल्याच्या पुलावरून हे वाहन खाली कोसळले.

tadoba-accident3

यात गाडीतील सर्वच पर्यटक जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोचत तपासकार्य सुरू केले सुरू असून अपघातग्रस्त वाहनात नागपूरचा अग्रवाल परिवार असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली.

tadoba-accident4