महामार्गावर कशेडी घाटात अपघात; एक गंभीर जखमी

64

सामना प्रतिनिधी, खेड

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात स्वामी समर्थ मँडरीनजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महिलांसह तिघेजण जखमी झाले. यातील चालकाला गंभीर दुखापत झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या अपघाताबाबत खेड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, सिद्धार्थ सुधीर काणे (रा. ब्राह्मण आळी, खेड) हा आपल्या ताब्यातील सुझुकी इग्निस मोटार (एमएच 08 एएन1999) घेऊन पोलादपूर येथून गुरुवारी दि 18 रोजी खेडला येत होता. कशेडी घाट उतरत असताना समोरून येणारी इनोव्हा मोटार(एमएच 01 बिजी 5131) ची सिद्धार्थ यांच्या मोटारीला समोरून धडक बसली.

या अपघातात सिद्धार्थ गंभीर जखमी झाले. इनोव्हा मोटार रस्त्याच्या बाजूला उलटल्याने त्यामधून प्रवास करणाऱ्या दोन महिला जखमी झाल्या आहेत. (नावे समजू शकली नाहीत) अपघाताची माहिती सिद्धार्थ याने खेड पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या