राहुरीजवळ अपघात; दुर्घटनेत पती-पत्नीचा मृत्यू

1405

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा रोडलगत मोटरसायकल आणि कारच्या अपघातात मोटरसायकलवरील पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली आहे. अपघातात भारत शंकर वाघापुरे (वय 60) आणि अनिता भारत वाघापूरे (वय 55, रा. देवळाली प्रवरा, खटकळी) या पतीपत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात कार आणि मोटरसायकल दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

वाघापुरे पतीपत्नी मोटरसायकलने देवळाली प्रवराकडुन राहुरी फॅक्टरी येथे दवाखान्यात उपचारासाठी जात होते. त्याचवेळी समोरून आलेल्या कारने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. अपघातात कारने मोटरसायकलला सुमारे 100 फुटांपर्यंत फरफरटत नेले. परिसरातील नागरिकांनी वाघापुरे पतीपत्नीला राहुरीच्या ग्रामीण रूग्णाल्यात दाखल करण्यास मदत केली. रात्री आठ वाजता राहुरी येथे शवविच्छेदनानंतर वाघापुरे पतीपत्नीचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या