सातार्‍याजवळ खासगी बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

391
truck-accident

सातारा शहराजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. थांबलेल्या ट्रकला पाठीमागून वेगाने आलेल्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर येथील डी मार्टजवळ पूजा पेट्रोल पंपासमोर पहाटे साडेपाच वाजता हा अपघात घडला.

पुणे – बंगळुरु महामार्गावरून निघालेल्या ट्रकचा टायर फुटल्याने तो रस्त्याच्या कडेला तो थांबला होता. बेळगाव येथील एसआरएस टॅव्हल्सची लक्झरी बस पुण्याहून कर्नाटककडे जात होती.पहाटे साडेपाचच्या सुमारास ही बस लिंब खिंड ओलांडून उताराला लागली. वेगाने जाणाऱ्या  बसच्या चालकाला पुढे थांबलेला ट्रक दिसला नाही. त्याने ट्रकला मागून जोरात धडक दिली.  अपघात घडला तिथे तीव्र उतार असल्याने लक्झरी बसचा वेघ आणकीनच वाढला होता. जेव्हा अपघात झाला तेव्हा या स्लिपर कोच बसमधील सर्व प्रवासी झोपेत होते.

बस आणि ट्रकची ही धडक इतकी जोरात होती की, बसचा पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. अपघाताचे वृत्त समजताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना तातडीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करुन रस्ता मोकळा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या