
संभाजीनगर- जालना रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रूझर आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ मेहेत्रे यांचाही समावेश आहे. सिंदखेडराजा इथल्या इगतपुरीमध्ये देवदर्शन करून परत येत असताना ही दुर्घटना घडली.
काशिनाथ मेहेत्रे, (65), रवी जाधव (31), ऋषीधर तिडके (65), संगीता जाधव (36) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. काशिनाथ मेहेत्रे हे गेली 25 वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत होते. त्यांच्या आणि इतरांच्या या अपघाती निधनामुळे नातेवाईकांना तसेच मित्रपरिवाराला प्रचंड धक्का बसला आहे.





























































